मुख्याध्यापिकांचे मनोगत

प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर, पुण    05-Sep-2025
Total Views |
 

principal advant wankhede
 
सामर्थ्य आहे शिक्षणाचे | जो जो उमजेल तयाचे |
परंतु तेथे राष्ट्रभक्तीचे | अधिष्ठान पाहिजे ||
 
·भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या विचारानुसार राष्ट्राची प्रगती ही स्त्री शिक्षणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना ही स्त्री शिक्षण व सक्षमीकरण या उद्देशाने १८९६ साली भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली . आजही याच उद्देशाने आपली संस्था प्रगतशील यशस्वी वाटचाल करीत आहे. संस्थेचा एक घटक असलेली कर्वेनगर पुणे येथील प्रा. म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिरची स्थापना ११ जून १९९१ साली करण्यात आली. कालानुरूप शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल झाले. या सर्व बदलांना स्विकारून विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य असे वातावरण निर्माण करून शिक्षण देण्याचे कार्य शाळा करीत आहे.
 
मुलांच्या डोक्यात काही कोंबणे हे शिक्षण नव्हे. मुल जन्माला येताना ज्या क्षमता बरोबर घेऊन येते त्या क्षमतांचा विकास करणे हे खरे प्राथमिक शिक्षण होय. हा विकास साधण्यासाठी विद्यालयातील प्राथमिक स्तरावर अनेक कृतिशील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घेऊन उपक्रमांचे उद्दिष्ट सफल केले जाते. एकूणच सर्व उपक्रमांकडे समाजाने सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य केले तर राष्ट्रात नवचैतन्य व नवसामर्थ्य दिसू शकेल.
 
काळाची पावले ओळखून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेमी इंग्रजी माध्यम, इंग्रजी संभाषण कौशल्य विकसन वर्ग, संस्कृत संभाषण वर्ग या सारखे अनेक उत्तम व विद्यार्थी कल्याणकारी उपक्रम शाळेत यशस्वीपणें सुरू आहेत.
 
विद्यार्थी, पालक, शिक्षक व सहशालेय घटक, समाज आणि अर्थातच संस्थेचे मार्गदर्शन यामुळे शाळेचा संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतीचा आलेख चढता राहील व भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रमन येथेच घडेल असा विश्वास वाटतो.
 
श्रीमती. कल्पना दिलीप वानखेडे
 
मुख्याध्यापिका