About School

15 Jul 2023 11:42:21

शाळेविषयी .....



शाळेची इमारत  

संस्थेच्या आवारातील प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक विदयामंदिर या शाळेने नुकताच रौप्यमहोत्सव साजरा केला. कर्वेनगर येथे संस्थेच्या आवारात असलेली आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा सराव पाठशाला असल्याने तिच्या संख्येवर मर्यादा होती. याकरिता संस्थेने कर्वेनगर येथे सन १९९१  साली नवीन प्राथमिक विदयामंदिर या नावाने शाळा सुरु केली. इ १ ली ते इ ४ थी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेली ही संस्थेची सातवी प्राथमिक शाळा.

कै. प्रा.म.ना.अदवंत यांच्या पत्नी श्रीमती लीलाताई व त्यांची मानस कन्या श्रीमती सुलभाताई बापट यांनी २००१ साली संस्थेत येऊन संस्थेचे कार्य पहिले. संस्थेचे कार्य पाहून त्यांनी प्रा.म.ना. अदवंत सरांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. लीलाताई व सुलभाताईंनी सरांच्या बद्दल माहिती दिली, त्यावेळी सर्वांना प्रा.अदवंत सरांचे साहित्य क्षेत्रात जे स्थान आहे त्याची माहिती झाली. त्याच वेळी संस्थेने ठरवले की, संस्थेच्या कर्वेनगर येथील आवारात असलेल्या नवीन प्राथमिक विदयामंदिर या शाळेला थोर साहित्यिक प्रा.म.ना. अदवंत यांचे नाव दिल्यास ते अत्यंत उचित होईल.

नवीन प्राथमिक विदयामंदिर या शाळेचे “प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक विदयामंदिर” असा नामकरणाचा समारंभ दि. ५ ऑक्टोबर २००१ रोजी अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. या कार्यक्रमासाठी श्री. अरुणभाई गुजराथी, माजी सभापती विधान सभा , महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सन २०१४ साली शाळेने प्रा.म.ना. अदवंत यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त प्रा.म.ना. अदवंत स्मरणग्रंथ प्रकशित केला.

प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक विदयामंदिर शाळेची शैक्षणिक प्रगती उत्तम असून, शाळेच्या विद्यार्थीनिनी विविध संस्था, संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या गायन, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, व वक्तृत्व इ. स्पर्धांमध्ये, महोत्सवी आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन अनेक बक्षिसे मिळवली आहेत. आजही पुण्यातील उपक्रमशील शाळा म्हणून शाळेचा लौकिक आहे.

Powered By Sangraha 9.0