आजी आजोबा पूजन २०२५-२६

प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर, पुण    03-Sep-2025
Total Views |

आजी आजोबा पूजन ...एक अभिनव उपक्रम 

 
 
 
 
सोमवार दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रा.म. ना. अदवंत प्राथमिक विद्यामंदिर येथे ‘आजी आजोबा पूजन’ हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी व भारतीय मूल्य जोपासणारी भावी पिढी तयार व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नाविन्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध निवेदिका, व्याख्यात्या व लेखिका मा. श्रीमती. विनया ताई देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रा.म.ना.अदवंत सरांच्या मानसकन्या मा. सुलभाताई बापट व मा. रोहिणीताई लाळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सर्व मान्यवरांचे प्रातिनिधिक स्वरूपात औक्षण केले व त्यानंतर जमलेल्या सर्व आजी-आजोबांच्या नातींनी आपापल्या आजी आजोबांचे औक्षण केले व सर्व मान्यवरांनी आणि आजी-आजोबांनी सर्व नातींना भरभरून शुभाशिर्वाद देखील दिले.

 

त्यानंतर सर्व उपस्थित आजी-आजोबांसाठी ‘गमतीची गाणी’ हा एक मनोरंजनात्मक गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मा. श्री. श्रीकांत साने व श्रीमती. मृणालिनी साने यांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्व आजी-आजोबांनी कार्यक्रमात छान सहभाग घेतला होता. सर्व आजी आजोबांसाठी **मनोरंजक खेळ** यांचे टेबल मांडलेले होते. सर्वांनी पुन्हा एकदा सर्व काळजी, चिंता दूर सारून, लहान होऊन खेळातील आनंद मनसोक्त लुटला. तसेच आजी-आजोबांसाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर आजी आजोबांनी आपल्या नातींसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

काही आजी आजोबांनी शाळेबद्दलच्या आपल्या भावना आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. त्यानंतर प्रमुख पाहुणे त्याचबरोबर अध्यक्ष यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून आजी आजोबा आणि आजची पिढी यांच्या नात्यातील वीण घट्ट करण्याचा छान प्रयत्न केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी व त्यासाठीचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती कल्पनाताई वानखेडे यांनी केले.