संस्थेच्या आवारातील प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक विदयामंदिर या शाळेने नुकताच रौप्यमहोत्सव साजरा केला. कर्वेनगर येथे संस्थेच्या आवारात असलेली आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा सराव पाठशाला असल्याने तिच्या संख्येवर मर्यादा होती. याकरिता संस्थेने कर्वेनगर येथे सन १९९२ साली नवीन प्राथमिक विदयामंदिर या नावाने शाळा सुरु केली. इ १ ली ते इ ४ थी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेली ही संस्थेची सातवी प्राथमिक शाळा..
सामर्थ्य आहे शिक्षणाचे | जो जो उमजेल तयाचे | परंतु तेथे राष्ट्रभक्तीचे | अधिष्ठान पाहिजे || ·भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या विचारानुसार राष्ट्राची प्रगती ही स्त्री शिक्षणाच्या गुणवत्तेवरअवलंबून असते. आपल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्ष
आमचे ध्येय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी उत्कृष्टतेचे एक मॉडेल बनणे आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा करण्यास आणि राष्ट्रीय विकासात आणि जागतिक समाजाच्या विकासात योगदान देण्यास सक्षम बनवले जाईल.
विद्यार्थ्यांना आनंददायी आणि आव्हानात्मक अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी अनुभव देणे आणि प्रोत्साहित करणे.विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचारवंत बनवणे जे सर्जनशील आणि सहकार्याने उपाय शोधू शकतील.विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू, आनंदी, सक्रिय आणि स्वतःबद्दल, इतर
आपला भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. निवडणूक हा त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ह्या निवडणुकीची प्रक्रिया विद्यार्थिनीना समजावी यासाठी दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेतली जाते. यात शाळेतील सर्व विद्यार्थिनी मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी वर्षभर शालेय कामकाज, उपक्रमात सहभाग घेतात.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘ सुराज्याचे शिलेदार’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात शाळेत करण्यात आली. आपल्या भारताचा दैदिप्यमान, प्रेरणादायी इतिहासाची व संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून ‘सुराज्याचे शिलेदार’ या व्याख्यानमालेची या सुरुवात करण्यात आली.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त ‘युवकांचे विवेकानंद’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.. या उपक्रमांतर्गतआपल्या संस्थेतील व इतर शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी, माजी विद्यार्थिनी तसेच आपल्या संस्थेच्या सर्व विभागातील कर्मचारीयांच्यासाठी आंतरशालेय‘कथाकथन स्पर्धा’ व ‘निबंध स्पर्धा’ या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
प्रा.म.ना.अदवंत प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शारदोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत पालक, विद्यार्थिनी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.‘सामान्यातील असामान्य नारीशक्ती’ या एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
आजी आजोबा पूजन - एक अभिनव उपक्रम
आजी आजोबा पूजन – हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत घेतला जातो. दरवर्षी १६ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम घेण्यात येतो. शिक्षणासोबत संस्कारही तितकेच महत्वाचे असतात. या भविष्यवेधी विचारातून गेली १२ वर्ष हा उपक्रम घेण्यात येतो. आजी आजोबांच्या शाळेतल्या सहभागाने आजी आजोबा आणि नात यांच्या नात्याची वीण आणखी घट्ट होते. आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम शाळेत घेतला जातो.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha